
कणकवली : कणकवलीतील महिलांसाठी आनंदाची बातमी सुपर ग्राहक बाजार मॉल यांच्या माध्यमातून कणकवलीतील सर्वात मोठा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती समोर तेली रोड सुपर ग्राहक बाजार मॉल या ठिकाणी सायंकाळी चार ते सहा या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील ,मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर व कॉमेडी किंग ओम यादव हे राहणार उपस्थित राहणार. या हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक भेट देखील मिळणार आहे. त्यामुळे कणकवलीतील महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे सुपर बाजार मॉलचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी सांगितले आहे.
तसेच सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या यासाठी कॉमेडी किंग ओम यादव हे उपस्थित राहणार आहेत. महिला व कपल साठी लकी ड्रॉ चे कुपन देखील वाटप करण्यात येणार आहेत. या लकी ड्रॉसाठी मध्ये लकी विजेत्याला वॉशिंग मशीन मिक्सर कुकर गॅस शेगडी अशी बक्षिसे उपस्थित महिलांना मिळणार आहेत.










