
कणकवली : कणकवली शहरातील बांधकरवाडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने ३ जानेवारी रोजी शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये निम्मेवाडी, भालचंद्रनगर, मधलीवाडी, कांबळे गल्ली, सुतारवाडी, टेंबवाडी, फौजदारवाडी, डेगवेकर पोहे मिल, शाळा नं. २, पिळणकरवाडी या भागांचा समावेश आहे. नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.










