कणकवली ते शिर्डी पदयात्रा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 02, 2026 18:41 PM
views 29  views

कणकवली : कणकवली ते शिर्डी पायी यात्रा दिनांक ११ जानेवारीला भालचंद्र महाराज आश्रमातून सकाळी ६ वाजता रवाना होणार आहे. ही पदयात्रा फोंडाघाट, वैभववाडी, कोल्हापूर, कराड, सातारा, लोणंद, मोरगाव, सुपा, न्हावरा, शिरूर, अहमदनगर बायपास करून दिनांक २४ जानेवारीला श्री क्षेत्र शिर्डी येथे सकाळी पोहचणार आहे. सदर पदयात्रेत सामील व्हायचे असेल त्यांनी आपली नावे ५ जानेवारीपर्यंत विशाल कामत ( 9421148333),  राजन परब  9422435444 यांच्याकडे नोंदवायची आहेत.