
कणकवली : हुंबरठ येथे दुचाकी व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार सावंतवाडी वरून राजापूरच्या दिशेने जात होता. यावेळी हुंबरठ येथे यु टर्न घेत असताना दुचाकीने मागून धडक दिली असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजत आहे. हा तरुण राजापूर येथील रहिवासी असल्याचे समजत आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. अपघातग्रस्ताला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयातुन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दुचाकी स्वरांच्या डोक्याला जास्त मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यामध्ये या युवकाचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालयातून देण्यात आली. पोलिसांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला केली व ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. घटनेची माहिती समजतात युवकाच्या मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली होती.










