कणकवली उपजिल्हा रुग्णालयात CTस्कॅन, एक्सरे सेवा सुरळीत

स्त्रीरोग तज्ञ पद रिक्तच | उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढतेय | रुग्णसेवेबद्दल समस्या असल्यास आमच्याशी संपर्क करावा : डॉ. विशाल रेड्डी
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 29, 2025 13:54 PM
views 52  views

कणकवली  : पालकमंत्री नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत काही दिवसापूर्वी जिल्हा आरोग्य विभाग अशी एकत्रिक बैठक पार पडली होती. त्यानंतर काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.  कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी दर्जेदार सेवा दिली जात आहे. काही त्रुटी असतील त्या दूर करुन चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. स्पाईन फाऊंडेशनच्या माध्यमातून 11 शस्त्रक्रिया याच उपजिल्हा रुग्णालयात झाल्या आहेत. रुग्ण व नातेवाईकांना आव्हान आहे की, काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन मशीन, एक्सरे मशीन सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती रुग्णालय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी दिली. 

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जे सीटीस्कॅन मशीन बंद होते. त्याठिकाणी नवीन सीटीस्कॅन मशीन इन्स्टॉलेशन करण्यात आले आहेत. एक्सरे मशीन देखील नवीन आलेली होती. ती नव्याने इन्स्टॉलेशन कऱण्यात आलेली आहे. अर्थिंग व किरकोळ विषयाचे अडचणी आहेत. ते दोन ते तीन दिवसांत पूर्ण करुन कार्यररत केली जाईल. स्वच्छता सर्वत्र करण्यात आलेली आहे. जे काही प्रश्न होते त्याबाबत स्वत: पाहणी करुन त्यातून  मार्ग काढला जात आहे. ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांबाबत कुठलेही गैरसोय होणार नाही. मी स्वत: ओपीडी करणार आहे. रुग्णांबाबत दिरंगाई करणा-या डॉक्टरांवर कठोर कारवाई करा, असा इशारा डॉ. विशाल रेड्डी यांनी दिला आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत. वॉर्ड मध्ये जे रुग्ण अधिक उपचारासाठी दाखल आहेत. त्या रुग्णांना सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टर आहेत. आर्थोपेडीक डॉ. रासम , डॉ. तायशेटे , डॉ. डोंगरे , मी स्वत: फिजीशियन आहे. सर्जरी रुग्ण डॉ. आचरेकर पाहतात. स्त्रीरोग तज्ञ जुन पासुन ते पद रिक्त आहे. ते भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्र दिलेलं आहे. शहरातील स्त्रीरोग तज्ञ आहेत  त्यांनाही याबाबत कळवलेले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्पाईनचे कॅम्प होत आहेत. स्पाईनचे रुग्ण असतील त्यांनी आगामी काळात होणा-या शिबिरात सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील मणक्याचे व हाडांचे गंभीर आजाराच्या रुग्णांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात यावे, असे आवाहन विशाल रेड्डी यांनी केले.

कलमठ येथील एका ताईने फेसबुक पोस्ट करत एका डॉक्टर संदर्भात तक्रार दर्शवली आहे. त्याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल. संबंधित ज्या महिला रुग्ण आहेत , त्यांच्यासमवेत चर्चा करुन योग्य तो उपचार करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे डॉ. विशाल रेड्डी यांनी सांगितले.