प्राथमिक शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दोडामार्ग शिक्षक भारतीने दिल्या शुभेच्छा
Edited by:
Published on: December 29, 2025 15:28 PM
views 16  views

दोडामार्ग : नुकत्याच पार पडलेल्या जि.प. शिक्षण विभागाच्या विभागस्तरीय स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 

या स्पर्धेत भालाफेक (पुरुष) प्रकारात दोडामार्ग तालुक्यातील मणिपाल राऊळ, शाळा कुंब्रल नं. ३, प्राची गवस शाळा पिकूळे नंबर 1महिला गट भालाफेक प्रथम सुडोकू प्रकारात प्रशांत पांडुरंग साबळे, शाळा मांगेली–कुसगेवाडीतर समजपूर्वक पुस्तक वाचन या स्पर्धेत निलेश बिरांजे, शाळा फुकेरी या तिघांनीही प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

या यशाबद्दल शिक्षण विभाग, दोडामार्ग यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, गटसमन्वयक सूर्यकांत नाईक, केंद्रप्रमुख सुधीर जोशी व केंद्रप्रमुख अंजली जोशी यांनी विजेत्या शिक्षकांचे खास अभिनंदन केले आहे.

या शिक्षकांच्या यशा बद्दल बोलताना गटशिक्षणाधिकारी नदाफ यांनी हे गुणवंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये निश्चितच मोलाचे योगदान देतील असा विश्वास व्यक्त केलायं. या या विजेत्या शिक्षकांना  शिक्षक भारती, दोडामार्ग आणि तळकट ग्रामस्थांच्या वतीनेही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षक भारतीच्या वतीने रविंद्र देसाई,  महेश नाईक, अरुण पवार, जनार्दन पाटील, गोपाळ पाटील, श्री. भोई आदीनी  शुभेच्छा दिल्या आहेत.