
कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम विद्यालय जवळ, कुडाळ येथे हे शिबीर होणार आहे. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत तर ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत हे शिबीर होणार आहे.
जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नवीन वर्षात उत्साही, आनंदी, निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील सर्वांसाठी हे शिबिर खुले आहे. जगप्रसिद्ध व जीवनाला कलाटणी देणारी दिव्य सुदर्शन क्रिया या शिबिरात तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवली जाणार आहे. निरोगी शरीर, आनंदी व तणावमुक्त मन, दैनंदिन कामात गुणत्मक वृद्धी, ऊर्जावर्धक ध्यान आणि प्राणायाम, व्यक्तिमत्व विकसनासाठी पूरक ज्ञान या शिबिरातून दिले जाणार आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी, मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी, आरोग्याची खरी काळजी घेण्यासाठी हे शिबीर करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. त्याचबरोबर येत्या २२ जानेवारीला श्री श्री रविशंकर यांना रत्नागिरी दौऱ्यात भेटण्याची संधी सुद्धा शिबिरार्थींना मिळणार आहे.
अधिक माहिती साठी आणि प्रवेश घेण्यासाठी नारायण - ९७६५७७५८१७, प्रमोद - ९४०४४३८३८९, विनायक - ९४२२३७३८८३, अंजली - ९७६२७१७५२८, सुचित्रा - ७७१९८१३३६० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर https://aolt.in/721399 या रजिस्ट्रेशन लिंक द्वारे सुद्धा प्रवेश निश्चित करता येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










