
कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर प्रभागामधील रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी गटार असल्याच्या कारणाने वाहन चालकांना येथून ये - जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब येथील नवनिर्वाचित नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना नागरिकांनी निदर्शनास आणून देताच नाईक यांनी स्वखर्चाने या गटारावर लोखंडी प्लेट टाकून तो रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करून दिला. याबाबत स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी नाईक यांच्यासह बाबू जाधव, प्रसाद चव्हाण, गुरु मोर्ये, संदेश जाधव, रवी भंडारे आदी उपस्थित होते.










