
कणकवली : कुर्ली (ता. वैभववाडी) येथील विजय बबन कोकरे (वय - २९) याचा तळेरे बसस्थानक येथे आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ५.३० वा. सुमारास उघडकीस आली. विजय बुधवारी सायंकाळच्या सुमारास तळेरे बसस्थानकात झोपला होता. स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रभाकर कामत यांनी त्याला पाणी मारून उठवले. मात्र, आपण येथेच झोपणार असल्याचे विजय याने सांगितले. रात्रीच्या सुमारास ड्यूटी संपल्यानंतर कदम स्थानकातून निघून गेले. गुरुवारी सकाळी कामत स्थानकामध्ये आले असता विजय तेथेच झोपलेला दिसला. कामत यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय याची कोणतीच हालचाल होत नसल्याने कामत यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी तपासणी केली असता विजय मृत्यूमुखी पडला होता. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.