
कणकवली : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील नागरिकांना 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक या ठिकाणी 10 हजार मोफत कमळ वाटप करण्यात येणार आहे. भाजपा पक्षाची निशाणी यानिमित्ताने गणेशोत्सव कालावधीत घराघरांमध्ये पोहोचवण्याचा ही अनोखी संकल्पना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील राबविण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा उपक्रम राबवला होता, त्याला शहरातील जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी देखील श्री. नलावडे यांनी हा कमळ वाटपाचा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले असून कणकवली शहरातील नागरिकांना प्रत्येकी दोन कमळ देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शहरवासी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नलावडे यांनी केले आहे.