
सिंधुदुर्गनगरी : कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड घातल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून हे प्रकरण कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना भोवले असून अतुल जाधव यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी निलंबित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैद्य धंदे सुरू असून या धंद्यावर तात्काळ आळा आणा अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस विभागाला वारंवार दिले होते. तरीही प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नव्हतं अखेर दस्तूर खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्याच मतदारसंघातील कणकवली सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत घेवारी याच्या मटका अड्ड्यावर धाड टाकली होती. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा अवैध धंद्यांना पोलिसांचे सहकार्य असल्याचा संशय व्यक्त करत यामध्ये दोशी असलेल्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.