
कणकवली : गोवा बनावटीची दारू गैर कायदा, बिगर परवाना, विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेल्या स्थितीत आढळल्याप्रकरणी सुनिता राजेंद्र धुत्रे (५८, कलमठ - बाजारपेठ) हिच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी संशयित महिलेच्या राहत्या घराच्या पडवीत सोमवारी दुपारी १२.३० वा. सुमारास केली. यामध्ये ४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईमध्ये हवालदार पांडूरंग पांढरे, सुदेश तांबे, कॉन्स्टेबल संजीवनी चौगुले आदी सहभागी झाले होते.