
कणकवली : धनगर समाज भावनाकरिता आरक्षित भूखंड मिळवणे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मुख्यालया ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी उभारणे करिता शासन स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. जिथे धनगर वस्ती तेथे शाखा काढणार असे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी सांगितले.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची बैठक जिल्हाध्यक्ष विजय खरात यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे घेण्यात आली. अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम सर्विस शूटिंग फायरिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त राष्ट्रीय स्तरावर कु. मनसे दिनेश फाले हिचा सर्वानुमते अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी नागेश रामचंद्र बोडेकर, देवगड तालुका अध्यक्ष गोविंद सखाराम कोकरे, कणकवली तालुकाध्यक्ष संजय सखाराम खरात यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकार्यांना जिल्हाध्यक्ष विजय खरात यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आली. आभार संजय खरात यांनी मानले.