कलमठ ग्रामपंचायतीचा स्वच्छता जागर

घरोघरी केला जातोय 'स्वच्छ कलमठ संकल्प' प्रचार
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 01, 2025 15:19 PM
views 226  views



कणकवली : 

कलमठ गावात १ ऑगस्टपासून कचरा संकलन नव्या नियमात होत असून , स्वच्छतादूतांसोबत ग्रामपंचायत टीम घरोघरी जाऊन कचरा  व्यवस्थापन पत्रके वाटप करत आहे. शुक्रवारी, पहिल्याच दिवशी ग्रामस्थानी १००% प्रतिसाद दिला असून नव्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.

कलमठ गावातील सामाजिक मंडळे, बचतगट बैठकांनंतर, वाडी, कॉलनीमध्येही बैठका सुरू असून त्यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ग्रामस्थांनी नव्या नियमांचे स्वागत करून सहकार्याची भावना व्यक्त केली.याबाबत सरपंच संदिप मेस्त्री यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. 

गावात रोज दवंडी दिली जात आहे. शुक्रवारी कचरा संकलनसाठी कलमठ बाजारपेठ येथे सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे,पपू यादव, श्रेयस चिंदरकर, तेजस लोकरे, कर्मचारी गौरव तांबे, समीर कवठणकर , प्रदीप कांबळी,राजू कोरगावकर उपस्थित होते.