
कणकवली : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कलमठ शहरच्या वतीने कलमठ बाजारपेठ शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. शाळेतील पाच होतकरू विद्यार्थ्यांना धीरज मेस्त्री व मित्रमंडळ यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्तक घेऊन त्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना देखील देखील शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. यावेळी कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थित लाभली. सतीश सावंत यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक उपक्रम करत रहा. त्यासाठी लागणारी मदत आम्ही करत राहू, अशी ग्वाही सतीश सावंत यांनी दिली.
सुशांत नाईक म्हणाले, धीरज मेस्त्री व मित्रमंडळ नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात. ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून चांगला उपक्रम राबविला, असे नाईक म्हणाले.
यावेळी किरण हुन्नरे, विलास गुडेकर, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, उपतालुका प्रमुख जितु कांबळी, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे,ग्रा.पं. सदस्या सौ. हेलन कांबळी, धीरज मेस्त्री, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कीर्ती मेस्त्री, माजी अध्यक्ष अमोल कोरगावकर,आशिष कांबळी, आशिष मेस्त्री आदी शिवसैनिक, मुख्यध्यापक,विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.