नगरसेविका दीपिका जाधव व सुजित जाधव यांची कार्यतत्परता

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 29, 2025 12:55 PM
views 447  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग 11 मधून कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका दीपिका जाधव यांनी विजयी झाल्यापासूनच आपल्या प्रभागातील विकास कामांविषयी जागरुकता दाखवली आहे. आपले भाऊ तथा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीपिका जाधव आपल्या प्रभागामध्ये फिरून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. 

प्रभाग 11 मध्ये जुन्या भाजी मार्केटनजीक नगरपंचायतीचे प्रसाधनगृह असून ते दुर्गंधी मुक्त करावे, अशी मागणी दीपिका जाधव यांच्या भेटीप्रसंगी नागरिकांनी केली. याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन जाधव यांनी नागरिकांना दिले. यावेळी पराष्टेकर घर आणि पवार बिल्डिंगमागील रस्त्यावरील सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार असल्याचे आश्वासन जाधव यांनी दिले. आमचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या संकल्पनेतील स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली घडविण्याच्या दृष्टीने आपण पहिले पाऊल टाकत असल्याचे जाधव म्हणाल्या.