
कणकवली : नगरपंचायत निवडणूकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतपेट्या मतदान केंद्रावर जाण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. कणकवली तहसील कार्यालयातून मतपेट्या कर्मचारी तपासून घेत आहेत. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात या १७ प्रभागांमधील मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. निवडणूक निरीक्षक देखील कणकवलीत दाखल होत आहेत. डीवायएसपी घनश्याम आढाव हे देखील तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल झाले असून पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. ८ अधिकारी ८६ अंमलदार ६८ होमगार्ड असे मिळून १६२ कर्मचारी पोलीस बंदोबसाठी तैनात करण्यात आले आहेत.










