आमदार निलेश राणेंची कणकवलीत गौरव हर्णेंच्या निवासस्थानी भेट

भाजपच्या गोटात खळबळ..?
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 24, 2025 19:08 PM
views 539  views

कणकवली :  मंत्री उदय सामंत यांची कॉर्नर सभा कणकवलीत होत आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे कणकवली दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी कणकवली भाजप  कार्यकर्ते गौरव हर्णे यांच्या घरी भेट दिली. यावेळी गौरव  हर्णे यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  या भेटीने शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहेत. भाजपच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे.