तलावारबाजी स्पर्धेत नडगिवे हायस्कूलचे यश

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 19, 2025 15:44 PM
views 20  views

कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय सिंधुदुर्ग व विद्यामंदिर हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय फेंसिन्ग (तलवारबाजी ) स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे‌ होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

 १४ वर्षांखालील मुलांचा गट : फॉईल प्रकार : प्रथम - झयान काझी, द्वितीय - अयान काझी, इपी प्रकारात‌ तृतीय - अवधूत शिंदे, प्रतीक जाधव, सेबर प्रकारात प्रथम - साहिल अडुळकर, द्वितीय - भार्गव गुळेकर, १४ वर्षांखालील मुली : फॉईल प्रकारात प्रथम - शुभ्रा चिके, तृतीय - रुद्रा कर्ले, इपी प्रकारात प्रथम - जिया तळगावकर , तृतीय - कांचन अडुळकर, सेबर प्रकारात प्रथम - देविका माळकर, द्वितीय - आराध्या पाटणकर, १७ वर्षांखालील मुले : फॉईल प्रकारात प्रथम - अरफात चौगुले, द्वितीय - तरेश तूरळकर, एस्री प्रकारात - प्रथमेश अडुळकर-, तृतीय - उझेर मुकादम,  सेबर प्रकारात प्रथम - मोहम्मद सआयग, तृतीय - प्रदयुम्ण स्वामी, १७ वर्षांखालील मुली : फॉईल प्रकारात प्रथम - नाबिहा काझी, इपी प्रकारात तृतीय - माही दयानी, सेबर प्रकारात तृतीय- मदिहा सातकूट, अलमास मुकादम या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. 

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एकनाथ धनवटे, प्रथमेश मन्यार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी  संचलित नॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल नडगिवेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, सेक्रेटरी मोहन कावळे, सहसचिव राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार परवेज पटेल, प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.