बुवा संतोष कानडे यांना मातृशोक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 19, 2025 15:36 PM
views 90  views

कणकवली :  भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष तथा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांच्या मातोश्री सुनीता हरिश्चंद्र कानडे (वय ७८ , रा. करमलकरवाडी, पियाळी) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दुपारी निधन झाले. सुनीता यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे संतोष कानडे यांनी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच भाजप‌ पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवार २० सप्टेंबरला रोजी सकाळी ९ वाजता पियाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सुनीता यांच्या निधनाने पियाळी गावावर शोककळा पसरली आहे.