
कणकवली : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या एसटीच्या सिंधुदुर्ग विभाग नियत्रंकपदी रायगडचे विभाग नियंत्रक दिपक धोंडीबा घोडे यांची सिंधुदुर्ग विभागाचे हंगामी नियंत्रक म्हणून प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गला बर्याच कालावधीनंतर विभाग नियंत्रक मिळाले आहेत. एसटी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या सहीने बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रकपद रिक्त असल्याने या विभागाचा कार्यभार रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांकडे सोपवण्यात आला होता. मात्र, आता सिंधुदुर्ग विभागाला हंगामी स्वरुपात का होईना विभाग नियंत्रक मिळाले आहेत.