अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचं दर्शन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 14, 2025 16:02 PM
views 93  views

कणकवली : कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा "कणकवलीचा राजा" या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी नुकतेच या कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले असून मोठा हार गणपती चरणी अर्पण केला.यावेळी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी श्री. नाईक यांचे स्वागत केले. 

गणपती गजाननाची पूजा-अर्चा,आरती करून कणकवलीतील नागरिकांच्या सुख समाधानासाठी तसेच निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी नाईक यांनी गणपती गजाननाकडे साकडे घातले. त्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ देखील घेतला. गणेश उत्सव मंडळाला आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अबिद नाईक यांच्यासोबत चर्चा केली.

प्रसंगी गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर, उत्सव समितीचे संचालक आणि शहर रिक्षा संघटना अध्यक्ष संतोष सावंत, रिक्षा संघटना जिल्हा कार्य उपाध्यक्ष महेश आंबडोस्कर, प्रसिद्ध निवेदक बाळू वालावलकर, सेक्रेटरी मनोज वारे, उदय मोरया तसेच इतर रिक्षा चालक-मारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबू सावंत, शहर अध्यक्ष इम्राण शेख, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर आदी  उपस्थित होते.