
कणकवली : कणकवली तालुक्यातील दशावतार कलाकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे बुधवार १० सप्टेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे. सर्व दशावतार कलाकारांनी वेळीच उपस्थित रहावे. येथे सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी येताना अगोदर काही उपचार सुरू असल्यास त्याचे रिपोर्ट तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढवयाचे असल्यास आधार कार्ड व रेशनकार्ड घेऊन यावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केले आहे.