उबाठा शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 08, 2025 16:45 PM
views 359  views

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न, जिल्हावासीयांना उद्भवणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या व उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी  सदर प्रश्न व  समस्यांचा आढावा घेऊन ते मार्गी लावण्याची ग्वाही दिली. 

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर,माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बंडू ठाकूर, अतुल बंगे, अवधूत मालणकर, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले, आप्पा मांजरेकर, समीर परब, श्री सावंत आदी उपस्थित होते.