
कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या मुलींच्या एनसीसी विभागाने व स्काऊट गाईड विभागाच्या मुलींनी रक्षाबंधन हा सण कणकवली पोलिसांना राखी बांधून साजरा केला. विद्यार्थिनींना एनसीसी विभागाच्या अधिकारी तथा विज्ञान शिक्षिका शर्मिला केळुसकर, स्काऊट विभागाच्या शिक्षिका विद्या शिरसाट यांनी मार्गदर्शन केले.
प्रशालेचे मुख्याधापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्यूत वणवे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर आदींनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.