
कणकवली : कणकवली शहरातील आचरारोड व इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत कणकवली नगरपंचायत मार्फत नियोजन करण्यात आलेले आहे. याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आचरारोड हा वर्दळीचा रस्ता असल्याने पोलीस प्रशासनाच्या मदतीने येथील खड्डे रात्री उशिरा किंवा दोन दिवस सदर रस्ता बंद ठेवून करण्यात येणार आहे.
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम नगरपंचायतीमार्फत हाती घेण्यात आले होते. परंतू, पावसामुळे काम करणे शक्य झालेले नाही. पण आता निविदा प्रक्रियेनंतर तत्काळ सदर काम करण्यात येईल, अशी माहिती कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली आहे.