
कणकवली : कलमठ गाव स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी कलमठ ग्रामपंचायतीच्या श्री देव काशीकलेश्वर सभागृहात सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता संवाद कार्यक्रम पार पडला. कलमठ गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयांना २००० हजार रुपये दंड करून त्यांचे फलक सार्वजनिक करण्याचे ठरले.
कलमठ गावातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनसाठी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून 'स्वच्छता संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामस्थांनी संकल्पना व सूचना मांडल्या. यावेळी उपसरपंच दिनेश गोठणकर ,माजी पंचायत सदस्य महेश लाड, माजी सरपंच निसार शेख, स्वप्नील चिंदरकर, कमलेश नरे, ग्रा.पं. सदस्य प्पपू यादव, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, अनुप वारंग, स्वाती नारकर, प्रीती मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, सचिन खोचरे, नजराणा शेख, हेलन कांबळे ,तन्वीर शिरगावकर, गुरू वर्देकर, श्रद्धा कदम, प्रकाश सावंत, मृणाल ठाकूर,अशोक कदम, संदीप म्हाडगुत, प्रनोती हिंदळेकर, ,सुशांत राऊळ,परेश कांबळी, गंगाधर कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तन्वीर शिरगावकर, गुरू वर्देकर, श्रद्धा कदम, प्रकाश सावंत, मृणाल ठाकूर,अशोक कदम, संदीप म्हाडगुत, प्रनोती हिंदळेकर, ,सुशांत राऊळ,परेश कांबळी, गंगाधर कदम यांनी स्वच्छता विषयक संकल्पना मांडून काही सूचना देखील केल्या. संदीप मेस्त्री म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर ग्रा.पं. प्रशासनान कठोर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलणार आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कलमठ गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी आपण एकत्र काम करूया. कचरा व्यवस्थापन साठी खर्च होणारा निधी हा आपल्याच करांमधून आहे. त्यामुळे आपण भरणा करत असलेला कर फक्त कचरा व्यवस्थापन वर खर्च होऊ नये. याची सर्वांनी काळजी घेऊया, असे मेस्त्री म्हणाले
१ आॅगस्टपासून कलमठ गावात कचरा संकलनसाठी वेगळे नियम करणे, संकलित कचरा विल्हेवाट लावणे, कचºयाचे योग्य विलगीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करणे यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक संदीप पवार यांनी कचरा विलगीकरण, व्यवस्थापनावर प्रबोधन केले, गावाचे आरोग्य आपल्याच सवयींमध्ये असून कचरा व्यवस्थापन हा विकासाच एक भाग असल्याचे सांगितले.
स्वच्छता संवाद कार्यक्रमात गावातील ३२ सामाजिक मंडळानी सहभाग घेत चर्चा केली, सूचना केल्या. १ आॅगस्टपासून ५ दिवस ओला कचरा तर एकदाच सुका कचरा घेतला जावा असे एकमताने ठरले. स्वच्छ वाडी स्पर्धा, स्वच्छ कॉलोनी स्पर्धा, स्वच्छ कलमठ प्रबोधन रिल्स स्पर्धांचे आयोजन करावे, गावात स्वच्छता दिंडी आयोजन, स्वच्छता दवंडी फिरवणे, नव्या नियमांची अंमलबजावी करण्याचे फलक लावणे अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी केले.