
कणकवली : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी मुंबई येथे नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षसंघटनेसोबतच विकासकामांसाठी निधी, दोडामार्गमधील हत्तीप्रश्नाबाबत चर्चा केली.
मुंबई येथे झालेल्या या भेटीवेळी जिल्ह्यात विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्गमध्ये पक्षसंघटना वाढ तसेच येऊ घातलेल्या स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा झाली. यावेळी दोडामार्गमधील हत्तीप्रश्नाबाबत श्री. नाईक यांनी श्री. तटकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी सदर प्रश्नाबाबत वनमंत्र्यांसोबत बैठक लावण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे श्री. तटकरे यांनी स्पष्ट केले.