
कणकवली : सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस पडत असून, कणकवली तालुक्यामध्ये 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पण काही सकल भागामध्ये पाणी देखील साचलं असून, शहरांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची काही प्रमाणात तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.