
कणकवली : तालुक्यात कामानिमित्त व अन्य व्यवसाय निमित्त येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद आता कणकवली पोलीस स्थानकात करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी कणकवली पोलीस ठाण्यात पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन देव-देवतांचा अपमान करणारी पोस्ट एका मुलीने टाकली होती. यावेळी आमदार नितेश राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक देत यासंबंधी कठोर कारवाई करा अशा सूचना देत तालुक्यात येणाऱ्या परप्रांतीयांची देखील नोंद आपल्या पोलिसांकडे ठेवण्यात यावी असे सांगितले होते. त्यानुसार कणकवली पोलिसांनी परप्रांतीयांची नोंद घ्यायला सुरुवात केली आहे.
येणारे फिरते विक्रेते व कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तीचे डिटेल्स घेण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये ते कुठून आले कुठे जाणार त्यांचे नाव काय त्यांचा ते कुठे राहतात मोबाईल नंबर घरचा पत्ता अशी माहिती घेऊन त्यांचे ओळखपत्र देखील घेतले जात आहे.










