कणकवली पत्रकारसंघाच्या वतीने पत्रकार उदय तावडेंचा सत्कार

Edited by:
Published on: June 13, 2025 20:45 PM
views 103  views

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उदय तावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतुन व्यवस्थापक या पदावर नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने उदय तावडे यांचा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , सुपारी रोपटे देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे , पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , पोलीस उपनिरिक्षक महेश शेडगे , सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, शिक्षण अधिकारी किशोर गवस, ग्रा.पा.पु. अभियंता घेवडे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ , जिल्हाकार्यकारिणी लक्ष्मीकांत भावे , सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे , सहसचिव दर्शन सावंत , उपाध्यक्ष उमेश बुचडे , तुषार हजारे , रंजिता तहसिलदार , उल्का तावडे , तुळशिदास कुडतरकर आदींसह पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार मित्र उपस्थित होते.