कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक प्रदीप कडुलकर यांचे निधन

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 05, 2023 10:53 AM
views 145  views

कणकवली : कणकवली शहरातील हॉटेल बासमतीचे मालक प्रदीप शंकर कडुलकर (वय 63) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे मूळ वरवडे येथील व सध्या कलमठ बाजारपेठेतील रहिवाशी होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. कणकवली शहरात बासमती हॉटेल च्या माध्यमातून ते सर्व परिचित होते. तर त्यांच्या हातची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कणकवली शहरातील हॉटेल मेजवानी चे मालक तेजस लोकरे यांचे ते सासरे तर बँक ऑफ इंडिया मधील कर्मचारी प्रणाली गोसावी यांचे वडील होत. त्यांच्यावर आज वरवडे येथे त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.