कणकवलीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पाणी पातळीची केली पाहणी..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 19, 2023 19:30 PM
views 450  views

कणकवली  : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी कणकवली गणपती साना येथे नदीच्या पाण्याची पातळी किती आहे याची पाहणी केली. व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना येथे येणारे पर्यटक व कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांना येऊ देऊ नये अशा सूचना देखील करण्याचे बोर्ड लावा असे सांगितले. जेणेकरून भविष्यात जास्त पाऊस झाल्यास कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी काळजी घेण्यात देखील सांगितले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत  विशाल तनपुरे प्रांताधिकारी जगदीश काटकर तहसीलदार आरजे पवार, मुख्याधिकारी अवधूत तावडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते.