
कणकवली : उज्ज्वला चंद्रशेखर धानजी- मळेकर यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या लेखसंग्रहाला पुणे येथील तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत, तितिक्षा आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह हा तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार 6 जून रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या तितिक्षा कलासाहित्य संमेलनामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी तितिक्षा भावार्थ पुणे या संस्थेकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. या पुरस्कारासाठी डिसेंबर 2024 ते मार्च 2026 या कालावधीत प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारात लेखन करणाऱ्या सारस्वतांकडून साहित्यकृती मागविण्यात आल्या होत्या. तितीक्षा संस्थेकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून 25 मे रोजी विविध प्रकारच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
उज्ज्वला धानजी यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या लेखसंग्रहाला या अगोदर महागाव तालुका गडहिंग्लज येथील प्राध्यापक रसूल सोलापुरे संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.सौ.उज्ज्वला धानजी यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या लेखसंग्रहाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.










