
कणकवली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोदजी तावडे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी कणकवली येथील आमच्या ‘ओम गणेश’ निवासस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तावडे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार विनोद तावडे यांचे खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे स्वागत करण्यात आले. दरम्यान पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.











