तिथवलीत टायर फुटून वीज खांब वाहतूक करणारा टेम्पो पलटी

दोन कामगार जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 12, 2026 17:32 PM
views 83  views

वैभववाडी : खारेपाटण -कोल्हापुर मार्गावर तिथवली-नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात झाला.यात दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथून वीज खांब घेऊन एक टेम्पो खारेपाटणच्या दिशेने निघाला होता. टेम्पोमध्ये वीज खांबांसह तब्बल सात कामगार प्रवास करत होते. तिथवली-नाऊळदेवाडी येथे आल्यानंतर अचानक टेम्पोचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.या अपघातात दोन कामगार जखमी झाले . त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

दरम्यान, टेम्पोमधून वीज खांबांसारख्या जड साहित्याची वाहतूक सुरू असताना त्याच वाहनातून कामगारांची वाहतूक केली जात होती. तसेच वाहनाचे टायर  वापरण्यास अयोग्य असलेल्या स्थितीचे होते.त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीच म्हणणे आहे.टेम्पो चालकाचा बेफिकीरपणा कामगारांच्या जीवावर बेतला असता.मात्र सुदैवाने मोठी हानी टळली.