
कणकवली : मुंबईहून गोव्याच्या दिशेला जात असलेली एसटी बस कणकवली बसस्थानक येथे जाण्यासाठी सर्विस रोडवरून उजवीकडे वळत असतानाच बसच्या मागील बाजूची पाठीमागे असलेल्या दुचाकीला धडक बसली. शनिवारी दुपारी वाचण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चक्क बसच्या मागील चाकाखाली कोसळली. तर दुचाकी चालवत असलेला शालेय विद्यार्थी रस्त्यावर फेकला गेल्याने सुदैवाने बचावला. अपघातानंतर नागरिक, प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.










