
कणकवली : शस्त्रक्रियेनंतर अति रक्तस्त्राव होऊन युवतीचा मृत्यू झाल्याबद्दल संतप्त ग्रामस्थांनी कणकवली शहरातील नागवेकर हॉस्पिटल व नर्सिंग होमची तोडफोड केल्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दाखल असलेल्या पोलिसांनी कौशल्याने संतप्त जनावर नियंत्रण ठेवण्यात काहीसं यश मिळवले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास युवतीचा मृतदेह देखील विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला. एकीकडे संतप्त ग्रामस्थांनी नागवेकर हॉस्पिटल व नर्सिंग होमची बरीच तोडफोड केली ही गोष्ट खरी असली तरी युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर तिच्या कुटुंबीयांना मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास पाच तासांचा अवधी जाणार आहे. रात्री १० नंतरच शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.










