चांद्रयान -3 लँडिंगचा ऐतिहासिक क्षण कणकवलीकरांना अनुभवता येणार

नितेश राणेंच्या संकल्पनेतून पटवर्धन चौकात लावणार एलईडी स्क्रीन
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 23, 2023 15:36 PM
views 1494  views

कणकवली : भारताचे चंद्रयान आज सायंकाळी 6 वाजून 4  मिनिटांनी चंद्रावर लँड होणार असून जगात भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण भारतामध्ये या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात असताना कणकवलीत देखील या चंद्रयान लँडिंग चा क्षण सर्व जनतेला पाहता यावा याकरिता आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली पटवर्धन चौकात चंद्रयान लँडिंग चा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. याकरिता कणकवली पटवर्धन चौक येथे भव्य स्क्रीन उभारली जाणार असून या स्क्रीनच्या माध्यमातून चंद्रयान लँडिंग चा ऐतिहासिक क्षण लोकांना अनुभवता येणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली पटवर्धन चौकामध्ये सायंकाळी 5.30 वाजल्यापासून हा सोहळा लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. जेणेकरून भारतातील प्रत्येक नागरिकाला असलेली ही उत्सुकता  कणकवलीकरांना देखील अनुभवता यावी याकरिता कणकवली शहरवासीयांनी पटवर्धन चौकात या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.