कणकवली तालुका शेतकरी संघाच्या मतदानास सुरवात

भाजप व उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात लढत
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 07, 2023 10:30 AM
views 402  views

कणकवली:कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १४ जागांसाठीची निवडणूक ७ जानेवारी म्हणजे आज सकाळी ८ वा सुरवात झाली  आहे. यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना व उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात थेट लढत होत आहे. भाजपची एक जागा बिनविरोध आली आहे. अनुसूचित जाती- जमाती मतदारसंघातून भाजपचे गणेश तांबे बिनविरोध झाले आहेत. प्राथमिक शेती सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप- शिंदे गटाकडून किरण गावकर, सुरेश ढवळ, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट व प्रशांत सावंत असे सात उमेदवार रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून दीपक कांडर, रावजी चिंदरकर,राजेंद्र राणे, संजय रावले, रविकांत सावंत व राजेंद्र सावंत असे सहा उमेदवार रिंगणात आहेत.

संस्था मतदारसंघातून एका जागेसाठी शिंदे गटाचे मिथिल सावंत व शिवसेनेचे श्रीकांत राणे, व्यक्ती सदस्य प्रतिनिधी गटातून भाजपचे प्रकाश सावंत, गुरुप्रसाद वायंगणकर. व सेनेचे प्रकाश घाडीगावकर व सुभाष सावंत यांच्यात, महिला प्रतिनिधीसाठी भाजपच्या लीना परब, स्मिता पावसकर व सेनेच्या स्वरुपा विखाळे, सुधा हर्णे यांच्यात लढत होत आहे. इतर मागास प्रवर्गातून भाजपचे सदानंद हळदिवे व शिवसेनेचे उमेश वाळके यांच्यात लढत होत आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपच्या विनिता बुचडे व शिवसेनेचे जयेश धुमाळे यांच्यात लढत होत आहे.