कणकवली रोटरी क्लबचा ३ आॅगस्टला पदग्रहण

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 31, 2025 20:39 PM
views 36  views

कणकवली : रोटरी क्लब कणकवलीच्या सन २०२५-२०२६ च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार ३ आॅगस्टला सायंकाळी ७.३० वा. मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला पीडीडी रो. आनंद कुलकर्णी, रो. प्रवीण कुंबोजकर, रो. सुभाष साजणे, रो. डॉ. विद्याधर तायशेटे, रो. सचिन माडमे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यंदाही क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांनी दिली.

येथील रोटरी क्लबच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. रावराणे बोलत होते. यावेळी विद्याधर तायशेटे, नवनिर्वाचित खजिनदार गुरुनाथ पावसकर, अ‍ॅड. दीपक अंधारी, दीपक बेलवलकर, मेघा गांगण, नवनिर्वाचित सचिव सुप्रिया नलावडे, लिना काळसेकर, प्रमोद लिमये, संतोष कांबळे, वीरेंद्र नाणचे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

श्री. रावराणे म्हणाले, रोटरी क्लब ही एक आंतरराष्टÑीय संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असतात. सिंधुदुर्ग जिल्ह््यात ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे ७ तालुकास्तरीय क्लब आहे. या क्लबच्या माध्यमातून त्या त्या तालुक्यांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कणकवली तालुका रोटरी क्लबतर्फे नुकताच गोपुरी आश्रमत येथे दिव्यांग मुलांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला. दिव्यांगांना जयपूर फूडचे वाटप करण्यात आले. अंधांना पाढरी काठींचे वाटप करण्यात आले. कणकवली रोटरी क्लबतर्फे फिजिओ थेरेपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी अल्प दरात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रोटरीची कार्डिओलॉजी रुग्णवाहिका आहे. क्लबने शव ठेवण्याची शवपेटीची व्यवस्था केली आहे. रुग्णांना क्लबने पेंशट बॅकची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तहसीलदार कार्यालय येथे एटीएम वॉटरची सेवा सुरू केली आहे. कसवण येथील नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी विहीर बांधून दिली आहे. उन्हाळयात पाणी टंचाई झळ बसू नये याकरिता रोटरी क्लब श्रमदानातून कच्च बंधारे बांधले जात असल्याचे रावराणे यांनी सांगितले.

रोटरी क्लबने यंदा तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल अ‍ॅपचे मोफत वाटप केले आहे. वृक्ष संवर्धनासाठी एक पेंड मॉ के नाम हा उपक्रम सुरु केला आहे. ११००० झाडे लावण्याचा संकल्प क्लबने असल्याचे रावराणे यांनी सांगितले. 

आत्महत्या रोखण्यासाठी रोटरी क्लबचा पुढाकार 

सिंधुुदुर्ग जिल्ह््यात अलीकडच्या काळात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्तींचे समुपदेशन रोटरी क्लबतर्फे केले जाणार आहे. समुपदेशनासाठी इच्छुक असलेल्यांना रोटरी क्लबतर्फे लवकरत एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला जाणार आहे. आमहत्या रोखण्यासाठी शाळांमध्ये रोटरी क्लब जनजागृती करणार आहे. याशिवाय युवा पिढी अंमलीपदार्थ व व्यसनांचा आहारी गेली. व्यसनाधिनतेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी रोटरी क्लब तालुक्यात नशामुक्ती अभियान राबवणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी रोटरी क्लबतर्फे डिजिटल बोर्ड लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

रोटरी क्लबचे पुरस्कार जाहीर 

कणकवली तालुका रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त उद्योग, सामाजिक क्षेत्रात काम उल्लेखनीय काम करणाºयांना पुरस्कार दिले जातात. यंदाचा बिझनेस अवार्ड चंद्रकांत लोणचे कंपनीचे मालक दिनेश नारकर, सोशल अवार्ड दिवाणी न्यायालयातील माधवराव खांबे, तर कम्युनिटी अवार्ड राजन चव्हाण यांना जाहीर झाला आहे.