कणकवली पोलिसांची अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई सुरूच..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 27, 2023 11:04 AM
views 357  views

कणकवली : कलमठ कोष्टीआळी येथे संशयित आरोपी श्रीमती अर्चना एकनाथ खामकर ( वय ५५) यांच्याकडून ५ हजार ७६० रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल व नडगिवे बांबरवाडी येथे ९६० रुपयांची गोवा बनावटी दारु संशयित आरोपी मेघेश दिलीप पाटील (वय ३७) या दोन अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली.या धाडीत गोवा बनावटीच्या दारुसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेले काही दिवस कणकवली तालुक्यात पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  गोवा बनवतीच्या दारू विक्री विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

कलमठ कोष्टीआळी येथे श्रीमती अर्चना एकनाथ खामकर (वय ५५) बिगर परवानाधारक गोवा बनावटीची मद्य विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बापू खरात,पोलीस हवालदार देसाई पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत माने, पोलीस कॉन्स्टेबल श्री. राऊत यांच्या पथकाने धाड टाकली .या ठिकाणी अवैध गोवा बनावटीची ५ हजार ७६० रुपयांचा गोवा बनावट दारुचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ९.३० वाजता वाजता करणेत आली.याबाबत फिर्यादी महिला पोलीस हवालदार नीलम उत्तम पवार यांनी दिली आहे.संशयित आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच नडगिवे बांबरवाडी येथे संशियत आरोपी मेघेश दिलीप पाटील (वय ३७)यांच्याकडे  गोवा बनावटी दारु कणकवली पोलिसांनी यांच्याकडून जप्त केली. 

ही कारवाई शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते यांनी केली. या आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई गुन्हा दखल करणेत आला आहे.