कणकवली : कणकवली नगरपंचायत निर्मितीला उद्या मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कणकवली नगरपंचायतच्या आजी माजी नगरसेवक व कर्मचारी यांचे स्नेह संमेलन होणार आहे. सायं. ४ वा. नगरवाचनालय हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.