'मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर'

कणकवली न.पं. कडून RRR केंद्राची स्थापना
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 17, 2023 19:45 PM
views 243  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत  "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" अभियान, स्वच्छ सव्हेक्षण २०२३ व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लॅस्टीक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन त्यांचा पुर्नवापर  करण्यासाठी  रिडयूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स म्हणजेच RRR केंद्राची स्थापना करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उददेश आहे. 

      RRR केंद्र हे २० मे २०२३ ते ०५ जुन २०२३ या काळावधीत रोज सकाळी ०९.००  ते दुपारी २.०० वाजेपर्यत जुनी नगरपंचायत इमारत येथे चालु ठेवण्यात येईल. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळील निरुपयोगी वस्तू ज्या पुनर्वापर करता येतील त्या या केंद्रावर जमा कराव्या तसेच ज्या गरजुंना अश्या वस्तूची आवश्यकता आहे त्यांनी या वस्तू RRR केंद्रावर संपर्क करुन घेऊन जावेत व शहरातील जास्तीस्त जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. अवधूत तावडे व प्रशासक श्री. जगदीश कातकर उप विभागीय अधिकारी, कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.