कणकवली न.पं.च्यावतीने शहीद सैनिकांच्या शिलाफलकाचे अनावरण

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 14, 2023 13:00 PM
views 295  views

कणकवली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश अर्थात (माझी माती माझा देश) या अभियाना अंतर्गत कणकवली नगरपंचायत कडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कणकवली शहरांमधील हुतात्मा झालेल्या  रामचंद्र गंगाराम कदम व सदाशिव गंगाराम बाईत या सैनिकांच्या आठवणीसाठी सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा नं. ३ येथे शिलाफलक अनावरण प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली नगर पंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.


नगरपंचायतच्या वतीने आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वा. ध्वजारोहण कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे करण्यात आले. सकाळी ९ वा. नगरपंचायत क्षेपणभूमी वसुधा वंदन  करण्यात आले. तसेच कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिक यांना वंदन करून त्यांच्या पश्चात उपस्थित सतीश सावंत, श्रीमती. वंदना बुचडे, सिताराम कुडतरकर. संतोष मुसळे, हरिश्चंद्र बाईत.सुलोचना बाईत. बाळकृष्ण सावंत. सहदेव जाधव,  सत्यवान देसाई,  तारामती गंगाराम पाछे यांना पुष्प झाड देऊन शाल व श्रीफळ देत गौरविण्यात आले. व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पंच प्रण शपथ देखील घेण्यात आली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक रूपेश नार्वेकर, माजी सैनिक संतोष मुसळे, महानंद चव्हाण,  मुख्य लिपिक किशोर धुमाळे, स्वछता निरीक्षक विनोद सावंत,लेखापाल प्रियांका सोनसुरकर, अमोल भोगले, लिपिक मनोज धुमाळे, विभव करंदीकर, सचिन नेरकर इतर नगरपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.