कणकवली गणपतीसाना - जानवली पुलाचे स्वप्न उतरले सत्यात !

भर पावसात कार्यकारी अभियंत्यांनी केली पाहणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 17, 2024 11:37 AM
views 917  views

कणकवल  : कणकवली शहराला ग्रामीण भागातील गावांना जोडणारा कणकवली गणपती साना - जाणवली पुलाचे काम अवघ्या २ महिन्यांत पुर्ण होत आले आहे. कणकवली शहरात येणाऱ्या लोकांसाठी हा पुल महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाची रुंदी ७.५ मीटर असून उंची ६ मीटर आहे.दोन्ही साईटला पादाचारांना चालण्यासाठी ट्रॅक आहे. या पुलाच्या कामाची अजयकुमार सर्वगोड यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असताना देखील भर पावसात रात्री ८ वाजता पाहणी करत संबंधित ठेकेदाराला दुरध्वनीवरुन आवश्यक त्या सूचना केल्या. आता हा पुल लवकरच वाहतूकीस खुला होणार आहे.

कणकवली गणपतीसाना - जाणवली पुलाच्या कामाची पाहणी दरम्यान अजयकुमार सर्वगोड यांनी पुलाला जोडणा-या जोड रस्त्याचे काम खडी पसरुन तातडीने करा. तसेच दोन्ही बाजुला असलेले जोडरस्ते पाहून येत्या आठ दिवसांत वाहतूक सुरु करण्याबाबत नियोजन करावे. जेणेकरुन नागरिकांची गैरसोय दूर होईल , अशा सुचना संबंधित ठेकेदाराला श्री. सर्वगोड यांनी दिल्या. 

यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू,उपअभियंता विनायक जोशी आदी उपस्थित होते.