
सावंतवाडी : संविधान अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे संविधान "जागर यात्रा" चं आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी दिली.
या यात्रेला सावंतवाडी मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सकाळी दहा वाजता आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात संविधान गौरव दिन संविधान अमृत महोत्सव सुरू आहे. मात्र, हे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशभरात सुरू आहे. या माध्यमातून लोकांना संविधानाबाबत माहिती पटवून देत एक प्रकारे बौद्ध समाजाला न्याय देण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टी करत असल्याच श्री. जाधव म्हणाले.यावेळी आंबोली मंडळ अध्यक्ष रविंद्र मडगावकर, परीक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.