
सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूलचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९७.६० टक्के लागला असून या प्रशालेतून परीक्षेला बसलेल्या ६८ विद्यार्थीमधून ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतून प्रथम क्रमांक गायत्री राजेश परब (९५%,), द्वितीय क्रमांक वैभवी उदय बांदेलकर (९४.६०%,) तर तृतीय क्रमांक भाग्यम संदीप धुरी (९२.६०%) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर ९०% च्या वरील विद्यार्थी अंतरा वैभव तानावडे (९२.४०), यश काळूराम गावडे (९२), गगन सत्यजित लेले (९०.६०) तसेच संस्कृत विषया १०० पैकी १०० गुण घेणारे विद्यार्थी रश्मिता भागीरथी बिहारी (९०.६०), प्रत्युष चेतन देसाई (८१.८०), अनन्या समीर गोरे (८१.८०) या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष शैलेश पई, मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे व सर्व पदाधिकारी आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.