कळसुलकरचा निकाल ९०.९० टक्के

Edited by:
Published on: May 05, 2025 14:12 PM
views 122  views

सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 90.90% लागला आहे. वाणिज्य विभागात चिन्मयी सोमस्कर 75.05% गुण प्राप्त करत प्रथम, द्वितीय विशाल गावडे 60.17% तर संस्कार भानसे 46.17% गुण मिळवून तृतीय क्रमांकांचा मानकरी ठरला आहे‌. तसेच कला शाखेतून दिपीका राऊळ 70% प्रथम, द्वितीय अंजली डोईफोडे 65% , सिमरन डोईफोडे 62% तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शैलेश पै, मुख्याध्यापक सुर्यकांत भुरे यांनी अभिनंदन केले.