
सावंतवाडी : कळसुलकर ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीच्या १९९४-९५ बारावीच्या बॅचने झाडे लावा,झाडे जगवा चा संदेश देत फुलझाडे भेट देऊन शाळेसंबधी आदर व्यक्त केला.
कळसुलकर ज्युनियर कॉलेज सावंतवाडी च्या बॅचने आपल शिक्षण या प्रशालेत घेऊन जीवनातील आपापल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. सर्व मित्र- मैत्रिणी शिक्षणाच्या वाटा निवडत इतरत्र विखुरले गेले. मात्र या डिजिटल युगात शीतल हळदणकर यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मित्र - मैत्रीणीना पुन्हा एकत्र आणलं.यातूनच सर्वानुमते स्नेहमेळाव्यातून एकत्र येण्याचे ठरले.यावेळी प्रत्येक जण आपल्या मित्र मैत्रीणीना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतानाच २ फेब्रुवारी २०२५ रोजी स्नेहमेळाव्याचे वेंगुर्ले तालुक्यातील कोंडूरे बीच वर आयोजन करण्यात आले. या दिवशी आपल रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून मित्रमैत्रीणी मुंबई,गोवा,सिंधुदुर्गातून एकत्र आल्या. स्नेहमेळाव्याचे आयोजन करतानाच आपण आपल्या स्नेहमेळाव्याचे प्रतीक म्हणून शाळेला फुल झाडे देण्याचं ठरवल. त्याप्रमाणे नंदकुमार गावडे माजी शिक्षक अशोक कुलकर्णी शाळेत घेऊन आले.यावेळी त्यांनी सुद्धा जुन्या आठवणी जागवत आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस केली.त्यांच्या हस्ते शाळेला फुलझाडे सुपूर्द केली.यावेळी प्र.मुख्याध्यापक एस व्ही भुरे, वैभव केंकरे आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक श्री.भुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शीतल हळदणकर,माधवी स्वार ,योगेश राऊत,मदन मुरकर,नंदकुमार गावडे ,सूरज कर्पे,चरण कासकर,शामल सावंत, एकनाथ राऊळ , प्रशांत गवस ,शुभांगी सावंत, अभय कुडतरकर,निर्मला बोंद्रे,मिलन परब उपस्थित होते.